InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन

- Advertisement -

नाराज असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनधरणीचा प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टवरून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली होती

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने आधीच भाजपला धक्का बसलाय. त्यातच पंकजा मुंडे नाराज असल्याने त्यांची नाराजी ही पक्षाला परवडणारी नाहीये. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.

Loading...

- Advertisement -

आपल्या पराभवाला पक्षातलेच नेते कारणीभूत आहेत असं मत पंकजा मुंडे यांचं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यांची नाराजी ही देवेंद्र फडणवीसांविरुद्ध असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे त्या बंडाचा झेंडा तर उभारणार नाहीत ना याबद्दलही अंदाज व्यक्त केले जात होते. त्यामुळे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मुंडे यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती पुढे आलीय. त्या दोघांमध्ये विविध राजकीय विषयांवरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.