InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती

नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी नंदलाल समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती. मात्र त्यांना अटक होऊ नये म्हणून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांना फोन करून अटक टाळण्यासाठी प्रयत्न केले असा असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

भुजबळांनीच फडणवीसांना वाचवलं, मात्र त्याची परतफेड म्हणून त्यांनी भुजबळांनाच आत टाकलं, असेही परब यांनी यावेळी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी महापौर होते.

परब म्हणाले की. नंदा समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीस यांच नाव आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना क्लीन चिट दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.