InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘४० हजार कोटींचा आरोप चुकीचा’; फडणवीसांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

‘८० तास मुख्यमंत्री असताना शेतकरी मदतीचा ५ हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झाला नाही. व्हॉट्सऍप फॉरवर्ड बातमीवर पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य. झालेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. असे पैसे केंद्र सरकार थेट देत नसतं आणि असा पैसा राज्य सरकार परत पाठवू शकत नाही,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Loading...

फडणवीस १५ तास मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत केले आणि मग राजीनामा दिला. महाराष्ट्र विकासआघाडी सत्तेत आली तर विकासासाठी असलेल्या निधीचा गैरवापर होऊ शकतो, असं फडणवीस यांना वाटलं आणि त्यांनी हे पाऊल उचललं, असं हेगडे म्हणाले होते.

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.