देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले, निवारा छावणीतच जेवले!

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने आंबेघरमधील नागरिकांसाठी मोरगिरीच्या शाळेतराहण्याची आणि जेवणसाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी या पुरग्रस्तांची शाळेत जाऊन भेट घेतली.

मोरगिरीतील शाळेत जाऊन त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, तेच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा