“देवेंद्र फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत”

मुंबई : ओबीसी अरक्षणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्ष या दोघांमध्ये घमासान सुरू आहे. याच प्रकरणात भाजपने ठाकरे सरकारचा घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर आता काँग्रेसने भाजपवर निशाण्यावर घेतलं आहे.

“देवेंद्र फडणवीस आरएसएस या त्यांच्या मातृसंस्थेच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत आणि त्याचे पहिले बळी हे मराठा आणि ओबीसी समाज ठरले आहेत. त्यामुळे भाजपने आता आंदोलनाची नाटकं थांबवावी कारण आरक्षण संपवण्यासाठी भाजपने रचलेले षडयंत्र पुराव्यानिशी जनतेच्या समोर आहे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

“जर एससी एसटीचं आरक्षण 50 टक्केच्यावर जात असेल तर त्या आरक्षणात कपात करून आरक्षण 50 टक्केच्या आत ठेवावं, असा अध्यादेश 31 जुलै 2019 रोजी फडणवीस सरकारने काढला होता. त्याचा पहिला फटका ओबीसीच्या आरक्षणाला बसला आहे. फडणवीस सरकारने आणि पंकजा मुंडे यांनी केंद्राला जातीच्या आकडेवारीसाठी पत्र लिहिलं होतं, मात्र त्यांचे पत्र केंद्रातल्या भाजप सरकारकडून फेटाळण्यात आली आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे.

“नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीपासून हा प्रकार सुरू झाला होता. ही निवडणूक हारण्याच्या शक्यता असल्यानं त्यांनी निवडणूका पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तर सर्वोच्च न्यायालयात देखील फडणवीस सरकारने कोणत्याही प्रकारचा डेटा न दिल्यानं ही परिस्थिती नाकारली उद्भवली आहे. खोटं बोलून आएसएसच्या विचारधारेप्रमाणे बहुजन जनतेला पुन्हा गुलाम करण्याचा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे,” असं अतुल लोंढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा