InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती’; फडणवीस यांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय घडले हे सर्व मला माहिती आहे, ते मी योग्यवेळी सांगेन, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, ”तिघे एकत्र येत असताना आम्हालाही काही करणे गरजेचे होते. दोन दिवसांपूर्वी अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की तीन पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. पवारसाहेबांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आमदारांचेही मत होते. अजित पवारांसोबत गेल्यानंतर आम्ही पत्र दिले आणि राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली. राजवट हटविल्यानंतर आम्हाला तात्काळ शपथ घ्यावी लागली. आमचा हा गनिमी कावा होता. आपल्याला राजकीय वाळीत टाकत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. पण, आमचा गनिमी कावा फसला. पण, तो योग्य होता की नाही हे काळ ठरवेल. 70 टक्के मार्क मिळविलेला पक्ष बाजूला राहिला आणि 40 टक्के मार्क मिळविणारे तीन पक्ष एकत्र आले. अजित पवार यांनी माझ्याकडे येऊन वैयक्तिक कारण सांगितले त्यानंतर जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. सर्वोच्च न्यायालय असा निकाल देईल, असे आम्हाला अपेक्षित नव्हते.”

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.