लसीकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार; राजेश टोपे

पुणे : गेले दोन वर्षे झाली आपण कोरोना या महामारीशी लढत आहोत. देशात महामारीचे संकट असताना कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येक राज्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. राज्याला प्रत्येक चार ते पाच दिवसांत १० लाख कोरोना प्रतिबंध लसी मिळायला पाहिजे. मात्र, सद्य:स्थितीत दोन ते तीन लाख लसी मिळत आहेत.

केंद्राने महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन केंद्र सरकारला भेटायला जाणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात असताना दिली. पूरस्थिती असलेल्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुरू करून लसीकरण करण्यास सांगितले आहे. तसेच आरोग्य युनिटही तयार करण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अलर्टनुसार योजना केल्या जात असतात. केंद्राकडून आलेल्या लसीचे आम्ही तातडीने लसीकरण करतो. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही निर्णय घेतले. जर शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास सांगेल तर याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून निर्णय घेऊ, असे टोपे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा