साहित्य संमेलनाला सावरकरांचे नाव देऊ नये, म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

नाशिक : राज्यात पुन्हा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. सावरकरांच्या विषयावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. शिवसेनेला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. यानंतर आता राज्यातील राजकारण तापाल आहे. यानंतर नाशिकमध्ये अ.भा. मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय.

मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते. त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्य म्हणतात. मग हे कसले सावरकरांचे वारसदार हा निर्लज्जपणा आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना लाज वाटली पाहिजे अशी टिका देखील फडणवीस यांनी शिवसेनेवर केलीय. नाशिकला आयोजित भाजपा पदाधिकारी मेळाव्या प्रसंगी ते नाशिकला आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा