“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांवर केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रताप सरनाईक अशा नेत्यांमागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि छाप्यांचे सत्र सुरु आहे.

त्यातच नांदेडमधील काँग्रेस नेत्यांवर ईडी पुढची कारवाई करणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अर्थात त्यांचा रोख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता. मात्र या सगळ्या कारवायांमागे राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसच असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यावर नाना पाटोळे म्हणाले कि, पहाटेला शपथ घेणारे सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांचे मंत्रिमंडळ झाले. त्यांचे 80 तासांचे सरकार हा महाराष्ट्रासाठी एक इतिहासच आहे. आता तर त्यांना दिवसादेखील स्वप्न पडायला लागलेत. ते सातत्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटत असतात, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फटकेबाजी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा