देवेंद्र फडणवीसांचं ‘या’ कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तातडीचं पत्र!

मुंबई : महाराष्ट्र कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे आता काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
याच पाश्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र लिहिलं आहे.

“सातत्यानं लावण्यात येणाऱ्या लाॅकडाऊनमुळे विविध छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांची स्थिती हालाकीची झाली आहे. आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्यानं या दुकानदारांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपूरमध्ये तातडीने निर्बंधात शिथीलता देण्यात यावी,” असं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटलं आहे.

“अर्थकारण आणि आरोग्य याचा सुवर्णमध्य काढावा लागेल. कोरोना विरूद्धची लढाई एकांगी होता कामा नये. आर्थिक टंचाईमुळे व्यापारी आपलं आयुष्य संपवत आहे. नालासोपारा, कल्याण, चंद्रपूर या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर व्यापाऱ्यांना सुट देण्याची गरज आहे,” असं फडणवीसांनी पुढे सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, ते पुर्णपणे हटवण्यात आले नाहीत. याबद्दल टास्क फोर्स अभ्यास करत असून मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील,” असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा