ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका; एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका 

मुंबई : ओबीसी अरक्षणावरून राज्यात वातावरण खूप तापलं आहे. यात ओबीसी नेत्यांसोबत भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

“1990 मध्ये मंडळ आयोगाने ओबीसींना आरक्षण दिलं होतं. त्यावेळीही भाजपने मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची ओबीसींना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट आहे. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले?,” असा आरोप एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

“फडणवीस सरकारच्या काळात तुम्ही केंद्राकडे डाटा मागितला होता. तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडेपणाच आहे. या सर्व प्रकाराला फडणवीसच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात,” असाही एकनाथ खडसे म्हणाले.

“मागील सरकारच्या काळातच मोदी यांनी डाटा दिला असता. तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही ओबीसींना आरक्षण मिळू शकले असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली असती तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे, अशी ‘युज अँड थ्रो’ची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे,” अशी जोरदार टीका खडसेंनी फडनवीसांवर केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा