बारामतीचे नेते आता पोपटासारखे बोलताहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर बारामतीचे नेते आता पोपटासारखे बोलू लागले आहे. मी विरोधी बाकावर होतो तेव्हा बारामतीत धनगर समाजाचे लोक आंदोलन करत होती, त्यावेळी गोपीनाथ मुंढे यांनी मला पाठवले आणि भाजप सरकार आल्यास आरक्षणाची शिफारस केंद्राकडे तत्काळ करू, असे ग्वाही द्यायला सांगितली होती. यावेळी बारामतीच्या आंदोलनाकडे बारामतीचे नेते मात्र फिरकले नव्हते. आता ते पोपटासारखे बोलताहेत. आपण जे करू शकलो नाही, ते हे कसे करताहेत, याचा त्यांना त्रास होतोय अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. ाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, अशी टीका  यांनी केली.

सिंचन योजनांतील भ्रष्टाचारावर फडवणीस यांनी भाष्य केले, ते म्हणाले विदर्भात पैसे येत नव्हते, आम्हाला वाटायचे पश्‍चिम महाराष्ट्रात जातो, आता आम्ही इकडे पाहतोय, तर इकडेही पैसे नाहीत. पैसे गेले कुठे हे साऱ्यांनाच कळले आहे असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.