माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ‘वर्षा’तून ‘सागर’मध्ये रवाना

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील ‘सागर’ या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला देण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार वर्षा बंगाला देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रॉयलस्टोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा रामटेक बंगल्यात मुक्काम असणार आहे. याआधी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाने त्यांना रामटेक बंगला देण्यात आला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळ सुरू असलेला सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात आल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष आणि विरोधीपक्षनेत्यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली. तर विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.