Devoleena Bhattacharya | ‘या’ व्यक्तीसोबत देवोलीनाने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर केला फोटो शेअर

Devoleena Bhattacharya | टीम महाराष्ट्र देशा: स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ (Sath Nibhana Sathiya) मधील ‘गोपी बहू’ (Gopi Bahu) घराघरात पोहोचलेली आहे. या मालिकेतील गोपी बहुचे पात्र साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharya) नेहमीच चर्चेत असते. देवोलीना कॅमेरापासून दूर जरी असली, तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यमान नेहमी चर्चेचे कारण ठरते. सध्या देवोलीना तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंड शहानवाज शेख सोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यात गुपचूप लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर देवोलीनाचे मेहंदी, संगीत आणि लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुरुवातीला देवोलीनाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिचं खरंच लग्न झालंय की नाही? यावर प्रश्नचिन्ह उभे होते. मात्र, देवोलीनाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची पोस्ट शेअर करत चाहत्यांना लग्न झाल्याची माहिती दिली आहे.

देवोलीनाने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या लग्नाची पोस्ट शेअर केली आहे. तिचा नववधुलूक मधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मुलाखतीमध्ये देवलीनाने सांगितले होते की, “मी माझा पती सध्या गुपितच ठेवणार आहे. वेळ आली की मी सगळं सांगेल.” त्यामुळे चाहत्यांना असं वाटलं होतं की, देवोलीना इतक्यात तिच्या पतीबद्दल काही सांगणार नाही. पण तिने इंस्टाग्रामवर लग्नाची पहिली पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या पतीबद्दल माहिती मिळाली आहे.

लग्नाचा फोटो शेअर करत देवोलीनाने त्याला एक सुंदर कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की,”मला सांगताना खूप अभिमान वाटत आहे की मी त्याची आहे.. शोनू मी अलादीन चा चिराग घेऊन जरी शोधायला निघाले असते तरी तुझ्यासारखा जोडीदार मला लाभला नसता. तू माझ्या सर्व प्रार्थनांचे उत्तर आहे. आय लव यु शोनू. माझ्या आयुष्यातील रहस्यमय व्यक्ती आणि तुमच्या सर्वांचे भावजी.” असे म्हणतं देवोलीनाने तिच्या पतीची ओळख करून दिली आहे.

देवीलीनाने शहानवाजसोबत सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये देवोलीना नववधूच्या रूपात खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली असून तिच्या पतीने काळा रंगाचा सूट घातलेला आहे. शहानवाज हा एक जिम ट्रेनर असून हे दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.