Dhairyasheel Mane | “काहीही झालं तरी बेळगावला जाणारच”; धैर्यशील माने यांची ठाम भूमिका 

Dhairyasheel Mane | पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनीही बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे.

धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना कानडी भाषेत पत्र आलं. त्यातून त्यांना प्रवेश नाकारल्याचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर आता धैर्यशील माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील ,शंभूराजे देसाई आणि मी लवकरच बेळगावात जाणार आहोत. कितीही विरोध केला, काहीही झालं तरी आम्ही बेळगावला जाणारच आहोत, असं धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) म्हणाले. आम्ही बेळगावात जाण्याचा निर्णय घेतलाय. अधिवेशन सुरू आहे पण आम्ही तिघे एकत्र कर्नाटकात दिसू, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय.

“मराठी माणसावर अन्याय होत असेल तर त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. मराठी माणसांना त्रास झाला तर कानडी माणसालाही त्रास होऊ शकतो हे कर्नाटक जाणून आहे. प्रत्येकानं आपल्या पक्षाची भूमिका मांडणं क्रमप्राप्त आहे. मराठी माणसांच्या पाठिशी महाराष्ट्र आहे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.