‘विरोधकांनी ७० वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढलाय!’

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड () ही पेट्रोलियम क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे, ज्याला बर्‍याच काळापासून तोटा सहन करावा लागत होता. सरकारने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या कंपनी अंतर्गत असम-आधारित नुमालीगड रिफायनरी लिमिटेड या विक्री योजनेतून वगळली जाईल.

दरम्यान, आर्थिक मंदीचा फटका केंद्र सरकारच्या ताब्यातील कंपन्यांनाही बसला आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) यासह पाच बडय़ा सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकार या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकणार आहे. यावरून आता चांगलच राजकारण तापलं आहे. भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशनसह पाच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. विरोधकांनी 70 वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढलाय! येणारी पुढची पिढी यांना कदापि माफ करणार नाही. अस म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार सरकारवर तोफ डागली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.