Dhananjay Munde | अब्दुल सत्तारांची सुट्टी? धनंजय मुंडेंना कृषी खात मिळण्याची शक्यता

Dhananjay Munde | मुंबई: 02 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी त्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. आज नवीन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dhananjay Munde can get Agriculture Department

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे कृषीखात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं काय होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानं भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशात अब्दुल सत्तारांचं खात धनंजय मुंडेंना दिल्यावर अब्दुल सत्तार त्यावर काय प्रतिक्रिया देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार गटाकडे महत्त्वाची खाती जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली असून थोड्याच वेळात ते त्यावर सही करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्यपाल लवकरच खातेवाटपाची यादी जाहीर (Dhananjay Munde) करतील, असही अजित पवारांनी म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अजित पवार गटाला (Ajit Pawar) खालील खाते मिळू शकतात.

अर्थ आणि नियोजन – अजित पवार (Ajit Pawar)

वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)

अन्न व नागरी – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

महिला व बालविकास – अदिती तटकरे (Aditi Tatkare)

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PWsxHA