Dhananjay Munde | “…तर तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार”; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

Dhananjay Munde | बीड : आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankja Munde) या बहीण-भावातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. बहीण-भावाची राजकीय मैदानात एकमेकांवर टीका अधून-मधून पाहायला मिळते. परळी वैजनाथ येथील सभेत बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे.

धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

“मी इथे कोणाचा फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही. मी दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या मोठा करतोय. आपल्या मतदारसंघात प्रकल्प येतायत. जलजीवन मिशनवरून सध्या राजकारण सुरू आहे. परंतु त्याचा प्रस्ताव मी मांडला होता. त्याचा आराखडा मी पालकमंत्री असताना तायर केला आहे. यासाठीच्या तांत्रिक मान्यतादेखील मी मंत्री असताना मिळवल्या आहेत”, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

“…तर तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार”

“आम्ही आणलेल्या तुमच्या ग्रामपंचायतीतील प्रकल्पांचं भूमीपूजन तुम्ही करा, पण आमच्यावर चुकीची टीका करू नका. मी आपल्या मतदार संघात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणलं आहे. आता माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता राज्यात तुमचं सरकार आहे, देशातही तुमचं सरकार आहे, देशातल्या सर्वात मोठ्या सभागृहात तुम्ही आहात, मग आता तुम्ही त्या एमआयडीसीमध्ये एक मोठा प्रकल्प तुमच्या ऐयपतीने आणा. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही म्हणाल ते मी राजकारणात करायला तयार आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता तुम्ही उद्योग आणा”, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Dhananjay Munde Criticize State government  

“माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं. दुसरं टेंडर करावं लागलं. काम सुरू झाल्यापासून दीड वर्षाच्या आत हा बायपासचा रस्ता पूर्ण केला. बायपासच्या अगोदर आणि आता जमिनीचे भाव किती आहेत. त्या जमिनीचे भाव चार कोटी रुपये एकर आहेत. आपण जमीन कसताना याचा विचार केला होता का. हा बदल आहे. विकास झाल्यानंतर जमिनीची किंमत वाढली पाहिजे”, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.