Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने करणार मुंबईमध्ये दाखल

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा काल परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांना छातीला मार लागलेला असून त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल केले जाणार आहे. मुंबईला जाण्यासाठी त्यांची लातूरहून एअर ॲम्बुलन्सने व्यवस्था केली जाणार आहे.

परळी शहरातील मौलाना आझाद चौकामध्ये त्यांचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडे मतदार संघातील काम आटपून रात्री परळीकडे परत निघाले होते. परळीकडे परत येत असताना त्यांचा हा अपघात झाला आहे. त्यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी अपघातानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृती बरी असल्याची माहिती कळवली होती.

महत्वाच्या बातम्या