Dhananjay Munde | परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, छातीला बसला मार

Dhananjay Munde | परळी: एकीकडे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे मतदार संघातील काम आटपून रात्री परळीकडे परत निघाले होते. परळीकडे परत येत असताना त्यांचा हा अपघात झाला आहे. त्यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

धनंजय मुंडे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहे, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”

धनंजय मुंडे यांच्या ट्विटवर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामध्ये कार्यकर्ते त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.