Dhananjay Munde । मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, धनंजय मुंडेंनी सांगितला राष्ट्रवादीत आल्याचा किस्सा

बीड : बीडमधील गेवराईत काल माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं होत. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थिती होते. हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिवजारीव पंडीत हे शरद पवार यांच्या निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा गेवराईत पार पडला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीत येण्यामागील कारण सांगितलं.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले कि, ‘मी जेव्हा भाजपमध्ये (BJP) होतो, तेव्हा मी भैय्यासाहेबांना (अमरसिंह पंडितांना) चकली देऊन भाजपमध्ये नेलं आणि ते आमदार झाले. त्यानंतर भैय्यासाहेबांनी (अमरसिंह पंडितांनी) मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, मी आमदार झालो’, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप-राष्ट्रवादीत येण्या जाण्याचा किस्सा सांगितला.

पुढे यावेळी धनजंय मुंडे यांनी म्हटले की, मी अनेक मान्यवरांची भाषणं ऐकली, तशी ती वाचली होती. मात्र, आपण सगळ्यांनी ती ऐकली. तसं काही कुणाच्या भाषणांवर बोलायचं नाही, इथं सगळेच आलेले आहेत. म्हणजे सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत, म्हणजे हे दोघेही वनवे आहेत, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागलं. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र ते देखील याठिकाणी अभिष्ठनचिंतन करायला इथं आले’.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.