InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर असताना  दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले होते. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.

धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली.

मुख्यमंत्री फडणवीस दोंडाईचा परिसरातून निघून गेल्यानंतर सखूबाई व नरेंद्र पाटील यांना पोलिसांनी सोडले. मात्र, नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. ‘मी 24 डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरी मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले’, असे त्यांनी सांगितले. शिवाय , आता मंत्री आल्याशिवाय आपण हलणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला होता. तसंच आता कुठलाही मंत्री गावात आल्यास मला आणि माझ्या कुटुंबाला असाच त्रास दिला जाणार का? असा सवालही नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.