धनंजय मुंडे इतक्या मोठ्या फरकाने विजयी; विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात…

परळी- बहीण पंकजाताई मुंडे यांना मात देत भाऊ यांनी अखेर विजय मिळवला आहे. जनतेनं यांच्या बाजुने मोठा कौल देत त्यांना 30 हजार 786 मतांनी मात दिली आहे.

पंकजाताई यांच्यासाठी पंतप्रधान आणि , यांनी सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यासाठी एकाही मोठ्या नेत्याने परळीत सभा घेतलेली नव्हती हे विशेष.

धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांचे आव्हान स्वीकारत विजय संपादन केला आहे. विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर सत्यमेव जयते, असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे. लेकीला सासरी पाठवल्या बद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद..!!, असे ट्विट त्यांनी केले आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्यात भावनिक राजकारण पाहायला मिळाले. मात्र यावेळेस परळीच्या जनतेने भावनेला न भूलता निर्णायक कौल दिला आहे. परळी मतदारसंघातून अत्यंत चुरशीची मानल्या जाणाऱ्या लढतीमध्ये पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय झाला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाने पंकजा यांच्या घराची सुरक्षा वाढवली होती.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.