सीएम आणा अथवा पीएम परळीत फक्त डीएम – धनंजय मुंडे यांच्या सभेत कार्यकर्त्यांचा जयघोष

साऱ्या राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक फार चुरशीची ठरणार आहे. पंकजा मुंडे यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले. असे असले तरी धनंजय मुंडे यांची शक्ती कमी झालेली नाही मोदींच्या सभेनंतर धनंजय मुंडे यांची परळी सभा झाली या सभेला तुफान गर्दी होते भर पावसातही धनंजय मुंडे यांच्या सभेची गर्दी जैसे थे होती याच गर्दीतून सिएम आना नाही,तर पीएम आणा परळीत फक्त डीएम अशा घोषणा देण्यात आला.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात होते महायुतीची संयुक्त सभा मुंबईत झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात सभा झाली मोदी यांच्या सभेला आलेल्या गर्दी पेक्षा जास्त गर्दी शरद पवार यांच्या सभेला होती. पवारांच्या भाषणादरम्यान पाऊस सुरू झाला. मात्र पवारांनी आपले भाषण सुरू ठेवले जोरदार पावसात ही सभेला आलेली गर्दी ही जशीच्या तशी होती आणि पवारही जोरदार भाषण करत होते.

याचप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी परळीत धनंजय मुंडे यांनीही सभा घेतली . या सभेस मोठी गर्दी झाली होती आणि पावसातच धनंजय मुंडे यांनीही सभा घेतली वर पाऊस सुरू असतानाही जोरदार भाषण धनंजय मुंडे यांनी केले. या भाषणाला प्रतिसाद म्हणून टाळ्या आणि शिट्यांचा गडगडाट झाला व कार्यकर्त्यांनी ना सीएम परळीत फक्त डिएम (धनंजय मुंडे) अशा घोषणा दिल्या. भर पावसातही धनंजय मुंडे यांच्यासाठी आलेली ही गर्दीही ही नरेंद्र मोदी यांच्या सभेला प्रत्युत्तर असल्याचेही राजकीय जाणकार म्हणत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.