InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तुम्ही काय स्वत:ला राजा समजता का?; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यभर रथयात्रा काढायला तुम्ही स्वत:ला राजा समजता का?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. रथयात्रा काढण्यापेक्षा दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना जाऊन दिलासा दिला असता तर बरं वाटलं असतं,असंही  धनंजय मुंडे म्हणाले.

राज्याच्या जीडीपीमध्ये शेतीक्षेत्राचा वाटा फक्त १२.५०% आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारला आत्मपरीक्षणाची गरज आहे. काढलेल्या कर्जाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी केला गेला नाही असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीसाठी केलेला उपयोग, विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

महत्वच्या बातम्या –

चंद्रकांतदादांनी फुकटची पाटीलकी करू नये – राजू शेट्टी

‘हकालपट्टी झाली तरी मी विधानसभा लढवणारचं’; आशा बुचकेंचा आक्रमक पवित्रा

विधानसभेत चंद्रकांतदादा चांगलेच अडचणीत; विरोधकांनी केला आक्रमक हल्ला

‘मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारचं’

‘मराठा आरक्षण वैध ठरणारचं’

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply