InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

धानोरकरांनी पवारांचे मानले आभार

- Advertisement -

काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात कारणीभूत ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुंबईत भेट घेऊन आभार मानले.

- Advertisement -

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून विशाल मुत्तेमवार, विनायक बांगडे यांच्याऐवजी धानोरकरांना उमेदवारी कशी मिळाली हे सर्वश्रूत आहे. या घडामोडीत शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती व धानोरकर यांनीही पवार यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली असे जाहीरपणे सांगितले होते.

वडेट्टीवार यांनी ६ जून रोजी धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमात उमेदवारी शरद पवार यांच्यामुळे नाही तर अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर धानोरकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. याबाबत प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीतही धानोरकर यांनी पवार यांचे आभार मानले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.