InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला अटक, मुख्यमंत्री आहेत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आणि धर्मा पाटील यांच्या पत्नी आंदोलन करू शकता अशी माहिती सुरक्षा यंत्रणाना मिळाली होती. याची खबरदारी म्हणून धर्मा पाटील यांच्या मुलाला आणि धर्मा पाटील यांच्या पत्नीला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितले.

कोण आहेत धर्मा पाटील

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती. जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचे सरकारचे धोरण असताना पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये मोबदला पाटील यांना मिळाला होता. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला मोबदला कमी मिळाला, हे त्यांच्या लक्षात आले होते.

वाढीव मोबदला मिळावा यासाठी पाटील यांनी मंत्रालय गाठले. मात्र त्यांना अधिकारी आणि मंत्रालयात योग्य उत्तरे मिळाली नाहीत. मंत्रालयातही काम होत नाही हे पाहून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर सरकारने पाटील यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे अनुदान देऊ केले. मात्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी सरकारचे अनुदान नाकारले. आम्हाला अनुदान नको, तर मोबदला हवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply