Dhirendra Krishna Maharaj | “संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज..”; धीरेंद्र कृष्ण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Dhirendra Krishna Maharaj | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रासह देशात चर्चेत आहेत. कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) प्रचंड चर्चेत आहेत.

अशातच आता त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात असून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.”

कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज?

बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म 1996 साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे.

बागेश्वर बाबांची पद्धत काय?

उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवायचं. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत आहे.

महत्वाच्या बातम्या :