InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

40 कोटी थकवल्या प्रकरणी धोनीची अम्रपाली विरोधात कोर्टात धाव

आम्रपाली ग्रुपने 40 कोटी थकवल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांने कोर्टात धाव घेतली आहे. 2009 मध्ये धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाला होता. २०१६मध्ये आम्रपाली ग्रुपने ४६,००० ग्राहकांचे पैसे घेऊन सुद्धा त्यांना फ्लॅट दिले नाहीत. हजारो लोकांची अम्रपाली ग्रुपने फसवणूक केली आहे.

आम्रपाली ग्रुपशी अनेक करार केल्यानंतर आपण दिलेल्या सेवेसाठी कंपनीने काहीही दिलेले नसल्याची धोनीची तक्रार आहे. कंपनीकडून धोनीला एकूण ३८.९५ कोटी रुपये देणे लागते. यात २२.५३ कोटी रुपयांच्या मूळ रकमेचा समावेश असून यात १६.४२ कोटींची रक्कम व्याजाची आहे. हे पैसे मिळवण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply