InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘धोनी एक असा खेळाडू आहे…’; सचिनने केले धोनीचे कौतुक…

भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी धोनीने अनेकवेळा पूर्ण केली आहे. मात्र धोनीचा गेल्या काही दिवसातील फॉर्ममुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत सचिन म्हणाला, “धोनी एक असा खेळाडू आहे, जो आधी काही चेंडू वाया जाऊ देतो. खेळपट्टी जाणून घेतो, गोलंदाजी समजून घेतो. त्यानंतर तो सामना शेवटपर्यंत घेऊन जाणं पसंत करतो. एका बाजूने खेळावर कंट्रोल ठेवण्याचं काम धोनी करतो”.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा फिनिशर महेंद्रसिंह धोनीने लौकिकाला साजेसा खेळ केला. बऱ्याच दिवसांनी धोनीची बॅट तळपल्यानंतर, धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोनीने या सामन्यात नाबाद ५५ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात सिक्सर ठोकून धोनीने भारताला ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला. धोनीच्या या खेळीनंतर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचं कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply