InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

धोनी-जडेजाची जोडी जमली, भारताची विजयाच्या दिशेने आगेकूच

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. न्यूझीलंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त एक धाव काढून बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे तिघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश कार्तिक सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांची चांगली भागिदारी असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला.

त्यानंतर हार्दिक पांड्या 32 धावांवर बाद झाला. पांड्यानंतर जडेजा आणि धोनी यांनी अर्धशतकी भागिदारी केली. मंगळवारी न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या. त्यामुळं आज 46.2 चेंडूपासून न्यूझीलंडचा सामना झाला. भुवनेश्वर कुमारनं आपले चार चेंडू टाकत 8 धावा दिल्या. रॉस टेलर आणि टॉम लॅथम सध्या फलंदाजी करत होते. जडेजाचा अफलातून थ्रोवर रॉस टेलर बाद झाला. त्यानंतर लॅथमचा जडेजानं उत्तम झेल पकडला. त्यामुळं भारताला धावांचे 240 आव्हान मिळाले. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं तीन विकेट घेतल्या. तर, जडेडा, चहल आणि बुमराह यांनी एक-एक विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून टेलरनं 74 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply