InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार’

हिंदुस्थानी संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनंतर एम.एस. धोनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वर्ल्डकपमधील पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात असताना भाजप नेत्याने धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेन असा दावा केला आहे. भाजप नेते संजय पासवान यांनी हा दावा केला आहे.

‘ आज तक ‘शी बोलताना संजय पासवान यांनी धोनीशी भेट घेऊन भाजप सदस्यतेबाबत चर्चा केल्याचे सांगितले. धोनीने क्रिकेटद्वारे देशाची खूप सेवा केली आहे. आता त्याने क्रिकेटमधून संन्यास घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावे असेही ते म्हणाले.तसेच या संदर्भात आपली त्याच्याशी चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. धोनीच्या सातत्याने संपर्कात असून लवकरच याबाबत निर्णय घेईन असेही पासवान म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply