दिया मिर्झाने केला मोठा खुलासा, “बॉलिवूडमध्ये होतात लैंगिक भेदभाव”

अभिनेत्री दिया मिर्झा 2001 सालात आलेल्या ‘रेहना है तेरे दिल में’ या सिनेमातून दियाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. समाजकार्य आणि विविध वक्तव्यांमुळे दिया कायम चर्चेत राहिली. नुकत्याच ब्रुट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत दियाने बॉलिवूडमधील लैगिंक भेदभावाचा खुलासा केला आहे. सुरवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये लैंगिक भेदभाव केला जात असल्याचं ती म्हणाली आहे.

या मुलाखतीत ती म्हणाली, “लोक लिहत होते, विचार करत होते आणि सेक्सिस्ट सिनेमा बनवत होते आणि मी त्याचा एक भाग होते. “असं ती म्हणाली. उदाहरण देत ती म्हणाली, ” त्या काळात मेकअप आर्टिस्ट हा पुरुषच असला पाहिजे आणि हेअर ड्रेसरचं काम एक महिलाच करू शकते असं होतं”. याच सोबत पुढे ती म्हणाली, “ज्यावेळी मी सिनेमांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यावेळी सेटवर जवळपास 120 क्रू मेंबर असायचे ज्यात मुश्किलीने 4 ते 5 महिला असायच्या. पुरुषीवृत्तीमुळे इथे मोठ्या प्रमाणात लैंगिक भेदभाव केला जातो.

पुढे ती म्हणाली,”मला खात्री आहे की गोष्टी आता सुधारल्या आहेत. कारण पितृसत्ता म्हणजे काय आणि लैंगिक भेदभाव म्हणजे काय? याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण झालीय.” असं ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा