InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

डायबेटीस आणि जीवनशैली यांचे महत्व सांगणारा वाचनीय लेख

- Advertisement -

जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाल्यापासून गेल्या ४० – ५० वर्षात जीवनशैलीशी संबंधित रोगांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषतः डायबेटीस बाबत भारत जगात अग्रगण्य ठरणार आहे. अर्थातच ही गोष्ट भारताला नक्कीच भूषणावह नाही. परंतु जीवनशैलीच्या मुळापर्यंत जावून ती बदलवून, या रोगाला रोखण्याची मानसिकता कोणाचीच नाही. नाही म्हणायला या संधीचा फायदा घेऊन आपली औषधे खपविण्यासाठी औषधी कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या जाहिरातींचा भडीमार जोरात चालू आहे.
लवकर निदान करून आधुनिक वैद्यकाच्या औषधाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली, म्हणजे आपण डायबेटीस वर विजय मिळवला, अशीच सर्वसामान्यांची धारणा आहे. त्यामुळे रक्तातील साखरेच्या आकड्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी डायबेटीस आतून शरीर पोखरतच राहतो आणि डोळे, किडनी यासारख्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊन अनेक उपद्रवांना सामोरे जावे लागते. तांत्रिक उपचारांनी आधुनिक वैद्यक हे उपद्रव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यालाच योग्य उपचार असे समाज आणि वैद्यक व्यावसायिकही समजतात. यापेक्षा आणखी शोकांतिका काय असू शकते? तेंव्हा समाजाची मानसिकता बदलणे हेच या ठिकाणी मोठे आव्हान आहे.
वास्तविक मानवप्राणीच एक असा निघाला की ज्याने निसर्गावर कुरघोडी केली आणि निसर्गानियमात स्वतः तर ढवळाढवळ केलीच, पण अन्य पशु, पक्षी, वनस्पती यांनाही त्याचे परिणाम भोगायला लावले. विजेच्या शोधाने आणि वापराने रात्रीचा दिवस झाला. रात्री उशीरा जेवणे, उशीरापर्यंत जागे राहणे, उशीरा झोपणे, सकाळी सूर्योदयानंतर उशीरा उठणे या गोष्टी समाजाच्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत, की यात आपले काहीतरी चुकते आहे, याची जाणीवच राहिलेली नाही.

याही पेक्षा मोठी कुरघोडी म्हणजे पारंपारिक, नैसर्गिक शेतीतील आमूलाग्र बदल ! हजारो वर्षे नैसर्गिक पद्धतीने शेती केली जात होती. वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी यांचा त्यात समतोल साधला जात होता. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने याच्या मुळावरच घाव घातला गेला. तथाकथित दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायींची संकरित जात निर्माण करण्यात आली. अशा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून कन्सर, डायबेटीस, ऑटिझम यासारखे आजार वाढू लागले. शेतीतील  तंत्रज्ञानामुळे बैलांची गरज राहिली नाही. सेंद्रीय खतांचा ओघ आटला. त्याला पर्याय म्हणून रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर सुरु झाला आणि सर्व सृष्टी विषमय झाली!

- Advertisement -

फार थोड्या लोकांना यातून होणाऱ्या विनाशाची जाणीव झाली. त्यातून पर्यावरणवादाची चळवळ उभी राहिली. परंतु अजूनही बहुतांश समाज या बाबतीत अडाणी आणि उदास आहे. हे सर्व चित्र बदलावयाचे असेल, तर पुन्हा नैसर्गिक जीवनशैलीकडेच वळावे लागेल.

वैद्य दिलीप गाडगीळ – 07767999336 / 07767999335

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.