ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का?; नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात काल पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषद शिवसेनेची असली तरी याचा मुख्य आकर्षण बिंदू हे संजय राऊत हेच होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप केले.
गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली सुरु आहे. मुंबईचे 70 प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीच्या नावाने 300 कोटी वसूली होत आहे. त्याबद्दल ईडी अधिकाऱ्यांनादेखील माहिती आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केली आहे. विशेष म्हणजे राऊतांनी वसुली करणाऱ्या चार जणांचे नावे देखील सांगितले आहेत. तसेच मी नंगा माणूस आहे. मी शिवसैनिक आहे. तुम्ही कितीही आरोप करा. मी लढणार आहे, असं देखील ते म्हणाले.
यानंतर यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ३०० कोटींच्या या आरोपांवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का? असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला.
तसेच पुढे केंद्र सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत. तसेच हे सर्व पेपर राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे, त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रश्मी ठाकरेंनी १९ बंगल्यांचा कर का भरला? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे; सोमय्यांचे आव्हान
- “आज फिर एक बिल्लीने…” ; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका
- कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत; किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक
- ‘खदखद परिषदेत स्वतःचाच ‘घाम’ निघाला, तोंडाच्या वाफा, हवेत गोळीबार!’
- “कोणाच्या भरवश्यावर तुम्ही तारखा देताय?”, चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचा सवाल