InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शरद पवार यांना पार्थ पवारला निवडून आणण्याची इच्छा होती का ? चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवारला निवडून आणण्याची खरोखरच इच्छा होती, तर मग त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांचीच घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.या निकालावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरच निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply