सुशांत प्रकरणात शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्कार झालाय का? ; भाजपचा कडवट सवाल

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल एम्सच्या डॉक्टर्सच्या टीमने दिला आहे. हा अहवाल आल्यानंतर शिवसेनेने भाजपवर सडकून टीका करायला सुरुवात केली होती.

मात्र सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. असं असताना राज्य सरकारला निष्कर्ष काढण्याची एवढी घाई का झाली आहे? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला केला आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांचा वारंवार अवमान केला जात असून शिवसेना नेत्यांनाही झालंय तरी काय? कदाचित शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.