“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली.

भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. या संदर्भात अतुल भातखळकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

पुढे ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले कि, मुख्यमंत्र्यानी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय? आपत्तीमुळे पिचलेल्या जनतेवर बघा कसे हातवारे करतोय? कसला माज आलाय यांना, जनतेचे अश्रूही दिसत नाहीत. इथेही सत्तेची मस्ती बाजूला ठेवता येत नाही.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा