“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

नवी दिल्ली: कोरोना लशींच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने केंद्रीय आरोग्य खात्याला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख मंडविया यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्राच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अपुऱ्या लसीकरणासाठी राज्येच कशी जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

अशातच गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आतापर्यंत राज्यांना वितरीत करण्यात आलेल्या लशींची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43,79,78,900 लसी वितरीत केल्या आहेत. यापैकी 40,59,77,410 लसींचा वापर झाला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. मात्र, त्याची स्वतंत्र आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नमूद केलेली नाही.

मात्र राजस्थानामध्येही लोक लसीकरणाला प्रतिसाद देत असल्यानं कोरोना लसींची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वांरवार लसीकरण तुटवड्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राजस्थानला केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात लस दिल्या नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. त्यावर आता राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी गहलोत सरकारवर टीका केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस काही झाडाला लागलेल्या का? की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक गहलोत आणि गुलाबचंद कटारिया यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कटारिया यांच्यावर सर्वजण टीका करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा