InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ऐकल का..? प्रामाणिक कर भरणाऱ्यांना मोदी सरकार बक्षिस देणार!

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना मोदी सरकार बक्षिस देणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यासाठीच्या प्रस्तावावर विचार करत आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना सरकार सार्वजनिक सुविधांमध्ये प्राधान्य देण्याचा विचार आहे. मागील महिन्याच्या एका रिपोर्टनुसार सरकार प्रामाणिक करदात्यांना रेल्वे स्टेशन, विमानतळ, टोल प्लाजा तसेच इतर सार्वजनिक सुविधांचा लाभ इतरांच्या तुलनेत प्राधान्याने देण्यासंबधी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान, सरकारच्या या प्रस्तावावर विचार करण्यासाठी सीबीडीटीने एक समिती स्थापन केली. या समितीने आपला रिपोर्ट सीबीडीटीला सुपूर्द केला आहे. आता लवकरच सीबीडीटी यावर आपला निर्णय घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply