फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेलात का?, नवाब मलिकांचा भाजप नेत्याला टोला

मुंबई : विधानसभा २०१९ ला मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यातील काही महत्वाच्या नावांपैकी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी मी भाजपमध्ये आल्यावर मला आता शांत झोप लागते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पाटलांच्या या वक्तव्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उडवली होती.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक म्हणाले की, हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप येते. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? बरं आता गेले ते गेले. आमच्यावर यंत्रणांचा वापर केला तरी महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडत नाही.

पण एक सांगतो आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. पण तुमची झोप उडवून टाकू. पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं हे माझ्याकडे दिलं. एक्साईज डिपार्टमेंट माझ्या दिलं जात होतं, पण ते मी नाकारलं. आमच्या धर्मात मद्यपानाला थारा नाही. रोज उठून तोच विषय समोर येणार, म्हणून मी हे खातं नाकारलं, असे मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा