InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सरकारचे #5YearChallange पाहिलंत का ?

सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या #10yearchallange च्या धर्तीवर भाजपकडून #5yearchallenge ही नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेच्या माध्यमातून भाजपने यूपीए सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांकडून #5yearchallenge हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर फोटो व मजकूर ट्विट केला जात आहे

गेल्या पाच वर्षांमध्ये देशात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, गावांपर्यंत वीज पोहोचवणे, शेतमालाच्या हमीभावातील वाढ, परकीय गुंतवणुकीचा वाढलेला ओघ, रस्ते उभारणी, गॅस कनेक्शन अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘३६० डिगरी मेकओव्हर’ अशा मथळ्याखाली पोस्ट शेअर केली आहे. तर भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर पोस्टमधून मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेसंदर्भात उचललेल्या पावलांचा उल्लेख केला आहे.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.