दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारमोहीम राबवली आहे. प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचे काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा, तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, असे मोदी म्हणाले.

पहिल्या चार टप्प्यात तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी वर्धमान येथे केला. त्याचबरोबर मतता बॅनर्जी यांचा एकदा पराभव झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाहीत. वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर तेही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे दीदी, तुम्ही एकदा गेलात की परत येणार नाहीत, असा टोलाही मोदी यांनी ममता बॅनर्जींना लगावला.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ते परत निवडून आले नाही. त्यानंतर वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर ते ही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे ममता दीदी तुम्ही एकदा निवडणूक हारून गेलात कि परत येणार नाहीत, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.