‘गडकरींना शिवसेनेवर आरोप करायला दाढीवाल्याने सांगितले नाहीत ना?’

नागपूर : महामार्गाच्या कामाता शिवसेनेच्या स्थानिक लोकल प्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीवरून वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर निशाणा साधला आहे.

“ज्यावेळी भाजप-शिवसेना युती होती त्यावेळी गडकरींना कधी शिवसेनेवर टीका करावीशी वाटली नाही का?, मात्र आज ते पत्र लिहून आरोप करत आहेत. त्यांना दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले नाहीत ना?”, असा सवाल करत पटोलेंनी मोदींवरही निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग झालेच पाहिजेत आणि त्यांची कामंही झाली पाहिजेत. जी लोक याला विरोध करतात, लोकांचं समर्थन काँग्रेस करत नाही, रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेससुद्धा आहे. मात्र 25 वर्षे एकत्र असूनही गडकरींना शिवसेनेचं काम कशी करते हे माहित नाही का?”, असाही सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा