Dilip Walse Patil | देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ आरोप तत्कालीन गृहमंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले…

Dilip Walse Patil | मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तसं त्यावेळी सीपींना टार्गेटच दिलं गेलं होतं, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोपावर तत्कालीन गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता”, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. फडणवीसांनी केलेले आरोप दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा आरोप

“माझ्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझा’च्या कार्यक्रमात केला होता.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.