Dipak Kesarkar | “काहीतरी कारण असेल म्हणून…”; संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी केसरकरांची प्रतिक्रिया

Dipak Kesarkar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर(Dipak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. आमच्यासाठी खासदार, आमदार आणि सर्वसामान्य नागरीक सारखेच आहेत. संतोष बांगर यांनी थोडा संयम राखला पाहिजे. ते हे एका पक्षाचे आमदार आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, हे मला मान्य आहे. आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“संतोष बांगर हे आक्रमक आमदार आहेत. ते जे काही करतात, त्यांच्यामागे एक कारण असते. मागे एकदा शालेय पोषण आहारात अळ्या साडपल्या होत्या. तेव्हा त्यांनी अशा प्रकारे वर्तन केले होते. आताही अशाच प्रकारे काही तरी कारण असेल. पण, कारण कोणतंही असो, अशा प्रकारे कोणाला मारहारण होता कामा नये. यासाठी कायदा आहे”, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या