‘कबीर सिंग’ची निंदा करणाऱ्यांना शाहिदचा थेट सवाल

अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाकडे २०१९ मधील आतापर्यंतचा यशस्वी चित्रपट म्हणूनही पाहिलं जातं. एकिकडे या चित्रपटाची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे याच चित्रपटातून हिंसा, शिवीगाळ दाखवण्यात आल्यामुळे त्यावर टीकाही झाली. दिग्दर्शकाने चित्रपटावर होणारी ही टीकेची झोड परतवून लावली. ज्यामध्ये आता शाहिद कपूरचाही समावेश झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच शाहिदने चित्रपटाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली होती, ज्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा ‘द इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये या चित्रपटावर होणाऱ्या टीकेविषयी आपलं मत मांडलं.

चित्रपट आपल्याला काही शिकवतो की नाही, किंवा आपण त्यामधून काही शिकतो की नाही ही सर्वस्वी आपली निवड असल्याचं शाहिद म्हणाला. चित्रपट हा एक आरसा आहे, एक असा आरसा ज्यातून सत्य सर्वांसमोर ठेवलं जातं, हे सांगत ‘कबीर सिंग’ हा प्रौढांसाठी साकारण्यात आलेला चित्रपट होता, ज्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो ही बाब त्याने स्पष्ट केली.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.