समांथाच्या ‘ऍरेंजमेंट ऑफ लव्ह’ चित्रपटातील बायसेक्सुअल भूमिकेची चर्चा…

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभूने फॅमिली मॅन २ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समांथा ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. गेल्या काही दिवसांपासून समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता समांथा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. मात्र, यावेळी समांथाच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एक संपूर्ण नवीन जग…मी २००९ मध्ये ये माया चेसवे या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. आता १२ वर्षानंतर पुन्हा एकदा ऑडिशन देताना मी तितकीच अस्वस्थ होते. पण दररोज तुम्ही काही BAFTA पुरस्कार विजेता आणि आपल्या आवडत्या ‘Downton Abbey’ आणि ‘The Good Karma Hospital’ सीरिजच्या दिग्दर्शकाला भेटन म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे आभार आणि या नवीन प्रवासासाठी मी खूप उत्साही आहे, असे कॅप्शन समांथाने दिले आहे.

समंथा रुथ प्रभू ‘ऍरेंजमेंट ऑफ लव्ह’ या चित्रपटात एका ‘बायसेक्सुअल’ महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. समंथा चित्रपटातील तामिळ बायसेक्सुअल महिलेची भूमिका साकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा