युक्रेन-रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी शरद पवार आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यात चर्चा
मुंबई : सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया युक्रेनच्या युद्धावर केंद्रित झालं आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरूवारी युध्दाची घोषणा करत पाच मिनिटांत युक्रेनवर आक्रमण केले.
यानंतर पुढे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन फौजा दाखल झाल्या असून युक्रेनची आता निकराची लढाई सुरू आहे. किव्ह रस्त्यांवर युक्रेन आणि रशियाच्या सैनियाकांमध्ये लढाई होत आहे. किव्हवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले होत आहेत. रशियान रणगाड्यांनी किव्हचे रस्ते धडधडत आहेत. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नागरिकांना शस्त्र उचलण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळे युक्रेनमधील सर्व सेवा ठप्प झाल्या असून हजारो भारतीय विद्यार्थी तिथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. भारतातले जवळपास २० हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. आमच्या पाल्यांना सुरक्षित भारतात परत आणलं जावं, अशी विनंती पालकांनी पवारांना केली होती.
यानंतर शरद पवार यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच खार्किव, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेल्गोरोड मार्गाने भारतात आणावे, असा सल्लाही पवारांनी जयशंकर यांना दिला आहे. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच सर्व भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही; सुप्रिया सुळेंनी दिला दाखला
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- ‘समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
- “मी एक रूपया जरी खाल्ला असेल तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
You must log in to post a comment.