Disha Salian Case | दिशा सालियान प्रकरणाची SIT मार्फत चौकशी होणार, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

Disha Salian Case | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. त्याचवेळी पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. दरम्यान शिंदे गट आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक धक्कादायक आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक होत चौकशीची मागणी केली. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदारांकडे असलेले पुरावे द्यावे. SIT मार्फत योग्य ती चौकशी होणार आहे. दिशा सालियान प्रकरणावरुन नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. यामुळे पाचवेळा सभागृह तहकूब करण्यात आले. कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशी सालियान प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

राजकीय दृष्टीकोणातून कोणी पाहू नये – अजित पवार

यावर अजित पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे सदस्य, महिला सदस्य आक्रमक झाले. वेगवगळी चर्चा करत होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चर्चा उपस्थित करण्यात आली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र याकडे राजकीय दृष्टीकोणातून कोणी पाहू नये. ही चौकशी सीबीआयकडे गेलेली होती. सीबीआयकडे निष्कर्ष काढला आहे की दिशा सालियान चौदाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्यामुळे अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले.

“त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का”, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारच्या हातात सीबीआय आहे. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. याचा तीव्र निषेध अजित पवार यांनी नोंदवला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. अॅफिडेविट आल्यामुळे त्यांना उत्तर देयला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोप अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

तर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करा –

अशा प्रकारे काम होत असेल तर मग पूजा चव्हाण प्रकरणाची देखील चौकशी करा. देवेंद्र फडणवीस जसे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तसे मी देखील होतो. आम्हालाही अधिकार होता. आम्हीपण चौकशीची मागणी करत होतो. त्यावेळी हे मान्यवर विरोधात असताना सभागृह बंड पाडण्यात आले. असे झाले तर सगळ्यांच्या चौकशा करा. चौकशी बंद झालेली असली तरी रिओपन करता येते. यामध्ये राजकारण करु नका, दिशा सालियानच्या आई-वडीलांची ही इच्छा आहे, असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.